बुलढाणा बस अपघात : मुख्यमंत्र्यांची मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

14

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) शनिवारी पहाटे बसचा (Bus Accident) भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण ३२-३३ प्रवासी प्रवास करत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अतिवेगामुळे या महामार्गावर अनेक अपघात होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.

या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केली आहे. झालेली घटना दुदैवी आहे, या घटनेत २५ जणांना मृत्यू झाला आहे. गंभीर प्रवाशांच्या उपचार सरकार करणार आहे. मृत्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Google search engine