विद्यापीठाने शेतकऱ्यांच्‍या आर्थिक विकासासाठी १० गावे दत्‍तक घ्‍यावी

राज्यपालांचे अमरावतीत दीक्षांत समारंभात आवाहन

22
राज्‍यपाल तथा कुलपती रमेश बैस
राज्‍यपाल तथा कुलपती रमेश बैस

अमरावती (amravati): विभागातील काही जिल्‍ह्यांमध्‍ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शेतकऱ्यांच्‍या आर्थिक विकासासाठी किमान दहा गावे दत्‍तक घ्‍यावीत आणि गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्‍यपाल तथा कुलपती रमेश बैस (Governor and Chancellor Ramesh Bais) यांनी येथे केले. पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्‍या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्‍ये आयोजित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या ३९ व्‍या दीक्षांत समारंभात ते अध्‍यक्षस्‍थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, श्री शिवाजी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.

रमेश बैस म्‍हणाले, विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या भागातील प्रत्‍यक्ष समस्‍यांचे आकलन होणे आवश्‍यक आहे. गाव परिवर्तन योजना राबविताना विद्यार्थ्‍यांना अधिकाधिक सहभाग घ्‍यावा, त्‍यामुळे त्‍यांच्‍या आकलनक्षमतेचा विस्‍तार होईल. त्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना विशिष्‍ट ‘क्रेडिट’ देखील प्रदान करण्‍यात यावे. विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण, बुद्धीचा विकास व स्वतःच्या पायावर उभे करण्यास हातभार लावणारे शिक्षण देणे, हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरण अमरावती विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे, ही आनंदाची बाब आहे, असे रमेश बैस म्‍हणाले.
ज्ञान हीच संपत्ती असून, ज्ञान चोरले जाऊ शकत नाही. राजांकडून जप्त केले जात नाही.

भावांमध्ये त्याची विभागणी होत नाही, ते सोबतही घेऊन जाऊ शकत नाही. ज्ञान जेवढे खर्च करू तेवढे ते वाढत जाते, त्यामुळेच ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया असून, आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी बनले पाहिजे. शिक्षित लोकांना प्रशिक्षण दिल्यास ते क्रांतिकारी परिवर्तन करू शकतात. दीक्षांत समारंभात दिलेल्या पारितोषिक व पदव्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. अमरावती विद्यापीठ स्त्री सबलीकरणासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.

Google search engine