मुंबई : लोअर परेलमधील कमला मिलमध्ये लिफ्टला अपघात झाला आहे. संबंधित लिफ्ट चौथ्या माळ्यावरून कोसळली आहे. यात १४ पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार लोअर परेलमधील कमला मिलमधील ट्रेड वर्ल्ड इमारतीमधील एक लिफ्ट कोसळली. या अपघातात १२ ते १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सुरक्षा रक्षकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी ८ जणांना परेलच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मुंबई अग्निशमन दलाला सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी देण्यात आली.