‘या’ जिल्हाध्यक्षांनी रामटेक मतदारसंघावर ठोकला दावा

19

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीत (MVA) उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेने मतदारसंघांवर दावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

नुकतीच मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर (Baba Gujar) यांनी रामटेक मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघ हवे आहेत, अशी मागणी काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. त्यात रामटेक (Ramtek), वर्धा (Wardha), गडचिरोली (Gadchiroli) आणि अमरावती (Loksabha) लोकसभा मतदारसंघांचा (Lok Sabha constituency) समावेश आहे.

रामटेक, गडचिरोली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आहे. राष्ट्रवादीला आता संधी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. रामटेकसाठी नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी मुंबईत धडकले होते.

आता रामटेकमध्ये शिवसेनेचे नेतृत्व उरले नाही. खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जैस्वाल शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आहेत. काटोलमधील दोन जागांपैकी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने रामटेकवर जोरदार दावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रामटेकची बाजू नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी मांडली.

Google search engine