अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी केला अत्याचार

शालेय प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी गेली होती शाळेत

30

गडचिरोली : एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी आलापल्लीतील एका शाळेत नुकतेच दहावीची परीक्षा उतीर्ण झाल्याने शाळा बदलण्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी (Adivasi) विद्यार्थिनीवर दोन युवकांनी मिळून अत्याचार (torture) केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी घडली असून याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपीचे नाव रोशन गोडसेलवार (२९ रा. आलापल्ली), निहाल कुंभारे (२४ रा. जीवनगट्टा) अशी आहेत.

एटापल्लीतील पीडित विद्यार्थिनी आलापल्ली एका शाळेत दहावीला (10th) नुकतीच परीक्षा देवून उतीर्ण झाल्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी शालेय प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी शाळेत गेली होती. त्यानंतर पिडीत मुलीच्या एका ओळखीतल्या मुलाने तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. संध्याकाळी दोन्ही आरोपींनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला व आलापल्ली येथील चौकात सोडून दिले.

भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची काही लोकांकडे वाच्यता केली. मात्र, कुणीही तिला प्रतिसाद दिला नाही. काहींनी तर तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला. त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. एटापल्ली पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून घेत प्रकरण अहेरी पोलिसांकडे वर्ग केले असता अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे

Google search engine