शरद पवारांना आलेल्या धमकीची राज्य सरकारकडून दखल

शिंदे - फडणवीसांकडून तपासाच्या सूचना

60
sharad pawar
sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar)  यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून त्यांनाही धमकी मिळाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे supriya sule) यांनी पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार दाखल केली. मात्र, अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

‘राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाचा अकाउंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तकडे तक्रार दाखल केली. याची तत्काळ दखल घेत राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

पोलिस आयुक्त – गृहमंत्री भेट

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बंदोबस्त वाढवला

या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Google search engine