अज्ञात महिलेचा दोन तुकड्यात मिळाला मृतदेह

ओळख पटू नये म्हणून डोकेही कापून फेकले

16
दोन तुकड्यात मृतदेह
दोन तुकड्यात मृतदेह

मुंबई : मीरा भाईंदर (Meera Bhayander)  परिसरातील समुद्र किनाऱ्यावर एका अज्ञात महिलेचा डोके (शिर) नसलेला आणि धडाचेही दोन तुकडे असलेला मृतदेह (dead body) सुटकेसमध्ये सापडला. भाईंदरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महिला २५ ते ३५ वर्ष वयाची असून तिच्या एका हातावर त्रिशूल (trident) आणि डमरू (Damru) गोंदवले आहे तर दुसऱ्या हातात कलाव (रक्षा सूत्र) बांधलेले आहे. पोलिस मृतदेहाच्या शिराचा शोध घेत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील (mumbai) उत्तन सागरी भागात मीरा भाईंदर परिसरात समुद्र किनाऱ्यावर डोके कापलेला महिलेचा मृतदेह सापडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर अल्फा ब्रँडच्या सुटकेसमध्ये तो टाकण्यात आला होता. दि. २ जून रोजी सकाळी ८ वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीने ही सुटकेस पाहिली आणि संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

या प्रकरणी पोलिसानी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध कलम ३०२ नुसार खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलम २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या महिलेच्या शव बगेत मेकअपचे सामानसुद्धा आढळून आहे आले. या मृतदेहाचे दोन्ही पाय एकत्र बांधलेले दिसून येत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेच्या ओळखीसह संपूर्ण प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

Google search engine