बार्टीत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना

महासंचालक वारेंची हकालपट्टी करण्याची मागणी

74
बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना
बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना

पुणे : डॉ. बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचून समताधिष्ठित (Equitable) समाज निर्माण व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र, त्याच बार्टीत (barti) बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर देवदेवतांची गाणी वाजवून त्यावर गाण्यांवर थिरकण्याचा गलिच्छ प्रकार बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. यामुळे बाबासाहेबांच्या विचारांनी विटंबना झाली असून वारेंची महासंचालकपदावरून ( post of Director General) हकालपट्टी करण्याची मागणी आंबेडकरी जनतेने केली आहे.

देशातील जनतेला अभिमान वाटावा,असे बार्टीने कार्य केले आहे. येथे आलेल्या कोणत्याही महासंचालकाने बाबासाहेबांच्या विचारांची प्रताडना करण्याचे धाडस कोणी केले नाही. मात्र तीन-चार महिन्यापूर्वी रुजू झालेले महासंचालक सुनील वारे यांनी बार्टीची ऐसीतैसी केली आहे. येरवडा येथील समतादुतांच्या कार्यशाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर ‘गोविंद बोलो हरी गोपाल बोलो…` या गाण्यावर महासंचालक सुनील वारे निर्लज्जपणे बेभान नाचले. आपण महासंचालक आहोत, याचे साधे भानही या अधिकाऱ्याला राहिले नाही. गेल्या काही दिवसांपासून बार्टीमध्ये काही अधिकाऱ्यांची मानमानी सुरूआहे.

आपल्या मर्जीतील लोकांना भरतीत नोकरी देऊन एकहाती सत्ता मिळविण्याचा प्रयत्न येथील निबंधक इंदिरा अस्वार करीत आहेत. सध्या बार्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची विटंबना करण्याचे काम सुरू केले आहे. याकामी महासंचालक सुनील वारे संमती देत असून त्यांच्याच पुढाकाराने बार्टीत हा लाजीरवाणा प्रकार घडला आहे. महासंचालक सुनील वारे यांची हकालपट्टी करण्याची मागणी आंबेडकरी जनतेने केली आहे. याविरोधात राज्य शासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे आंबेडकरी जनतेने म्हटले आहे.

Google search engine