अकोला : जिल्ह्यात मंगळवारी दुसऱ्या दविशी तापमान स्थिर होते. दुपारी तीनपर्यंत उन्हाचे चटक बसत असतानाच संध्याकाळी ४२.७ अंश सेल्सिअस (Celsius) तपमानाची नोंद केली. अकोला (akola) विदर्भात सर्वाधिक तापल्याचे नोंदीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीस अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वातावरण घटले हाेते. त्यानंतर त्यानंतर मे च्या दुसऱ्या आठवढ्यात तापमान वाढले. नंतर काही दिवस उन्हाची तीव्रता (Intensity of summer) किंचित कमी झाली. मात्र चौथ्या आठवड्यात पुन्हा तापमान वाढतच आहे.
असे आहे विदर्भातील तापमान
विदर्भात काही दविसांपासून सरासरी तापमानात वाढ होत असून, ३० मे रोजी पुढीलप्रमाणे तपमानाची नोंद करण्यात आली. अकोला ४२.७ अमरावती ४२.२ बुलढाणा ४०.६ ब्रम्हपुरी ४०.० चंद्रपूर ३७.४ गडचिरोली ३९.२ गोंदिया ४०.४ नागपूर ३९.९ वर्धा ४१.० वाशीम ४०.० यवतमाळ ४०.०