चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (bank) संचालकांची नार्को टेस्ट (Narco test) करण्यात यावी अशी काँग्रेसचे (congres) प्रभारी जिल्हाध्यक्ष राम तिवारी 9 ramu tiwari) यांनी मागणी केली. या वक्तव्याचा संचालकांकडुन तिव्र निषेध करण्यांत आला. रामु तिवारी यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी त्यांचेवर गोळीबार केलेल्या व पकडलेल्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यामध्ये श्री. रामु तिवारी यांना मिरची लागण्याचे तसेच पोटशूळ उठण्याचे काहीच कारण नाहीं. रामु तिवारी यांनी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्याऐवजी बँकेच्या सर्व संचालकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करणे म्हणजे तपास यंत्रणेची दिशाभुल करून ख-या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार दिसतो, अशी टीका करण्यात आली.
जिल्हा बँकेत कॉंग्रेस पक्षाचे १५ संचालक मागील २० वर्षापासुन असून रामु तिवारी हे नुकतेच भाजपा मधुन कॉंग्रेस पक्षात आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकविण्याची काहीच गरज नाही असेही संचालकांनी सांगीतले.
जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून बँकेवर कॉंग्रेसची सत्ता आहे. मागील ३वर्षात संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली बॅकेने लक्षणीय प्रगती केली आहे, आहे यावेळी सांगण्यात आले. यावेळी
उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, डॉ. विजय देवतळे, संदिप गड्डमवार, पांडुरंग जाधव, संजय तोटावार, राजेश रघाताटे, ललित मोटघरे, प्रकाश बन्सोड, निरा देवतळे यांची उपस्थिती होती.