बापाने विकले, चिमुकलीवर चौघांनी केला अत्याचार……

76
चिमुकलीवर चौघांनी केला अत्याचार
चिमुकलीवर चौघांनी केला अत्याचार

सोलापूर( solapur ) : प्रेमविवाहातून जन्मलेल्या अल्पवयीन मुलीला कला केंद्रात पाठविल्यानंतर तिच्यावर केंद्रा मध्ये आलेल्या चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पिता,कला केंद्राच्या कार चालक व ४ ग्राहकांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेच्या आईने आरोपी पतीसोबत २००५ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यावेळी त्यांना मुलगी झाली होती. त्यांच्या दोघांत पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यानंतर पीडित मुलगी ही पित्यासोबत राहत होती. दरम्यान, पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीला बापाने चक्क विविध जिल्ह्यांतील कला केंद्रात पाठविल्याची धक्कादायक घटना, रविवारी उघडकीस आली होती. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी पित्याने पीडितेला पैशासाठी पुणे, सोलापूर, बारामती या कला केंद्रांत सोपविले.

शिवाय यावेळी पीडितेला चार ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.

याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पित्यावर तसेच छाया नेर्लेकर (रा. सोलापूर), धोंडराईकर , अनिता वाघोलीकर, मीना पारगावकर (रा. अहमदनगर) व पीडितेवर अत्याचर करणारे अनोळखी अशा चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी पित्याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Google search engine