कल्याण : दुचाकी चालविणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर तरुणी पाणी टाकत असतांनाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. त्या तरुण आणि तरुणी विरोधात कल्याण येथील मध्यवर्ती पोलीस ( police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वाजनिक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून डोक्यात हेल्मेट न परिधान करता तसेच बेकदरपणे दुचाकी चालवत असतांनाचा विडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नंतर धावत्या दुचाकीवर रील शूट करणे या जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. उष्ण तापमानामुळे (temperature) पारा ४० अंशावर गेल्याने एका तरुण तरुणीने रील शूट करण्याचे ठरवले. दुचाकी चालविणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर तरुणी पाणी टाकत असतांनाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विडिओ प्रकरणी पोलीस हवालदार छबीलाल महाजन यांच्या तक्रारीवरून तरुणावर आणि त्याच्या मैत्रिणीवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वाजनिक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून डोक्यात हेल्मेट न परिधान करता तसेच बेकदरपणे दुचाकी चालवत असतांनाचा विडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सांवत करीत आहेत.