मुंबई : अल्पवयीन (minor) मुलांना गाडी चालवायला दिली आणि अनेक अपघातझाले (accident)अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागले अशा अनेक घटना आपण ऐकल्या, राहिल्या असेल मुंबई मध्ये सुद्धा अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात आपल्या सोळा वर्षाच्या मुलीला स्कुटी चालवायला देणं एका पित्याला चांगलंच महागात पडला आहे. मुलुंड मध्ये राहणारे 16 वर्षाच्या मुलीने आपल्या मैत्रिणीसोबत फेरफटका मारण्यासाठी वडिलांकडून स्कुटीची चावी घेतली. ही सोळा वर्षाची मुलगी आणि तिच्यासोबत बारा वर्षाची दिशा या दोघी मुलुंडच्या केळकर कॉलेज परिसरात असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर स्कुटी चालवत होत्या त्यावेळी अचानक स्पीड ब्रेकर वरून ही स्कुटी स्लिप होऊन थेट डिव्हायडर ला जाऊन आदळली ज्यामध्ये मागे बसलेल्या बारा वर्षाच्या दिशा हिचा जागीच मृत्यू झाला होता.
या संदर्भात दिशा हिच्या वडिलांनी तिचे मैत्रिणीचे वडील अमर डोंबे यांच्या विरोधात नवघर पोलीस (Mumbai Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. अमर डोंबे यांनी आपली मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला गाडी चालवण्याची परवानगी दिली त्यामुळे अमर डोंबे हेच या प्रकरणात दोषी असल्याचं आरोप दिशा हिच्या वडिलांनी केला आहे त्यानुसार आता नवघर पोलिसांनी मोटर वाहन अॅक्ट ( motor vehicle act) अंतर्गत नवघर पोलीस ठाण्यात अमर डोंबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.