हिंदू महासंघाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण

43

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील घटनेनंतर हिंदू महासंघ (Hindu Mahasangh) आक्रमक झाला असून आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Mandir) प्रवेशद्वाराचे शुध्दीकरण करून पूजा करण्यात आली. यावेळी हिंदू महासंघासह अनेक हिंदू संघटनांनी निदर्शने केली. यावेळी पुणे, नाशिक येथील हिंदू संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणावरून दोन दिवसांपासून वातावरण तापले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चार उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून हा वाद चांगलाच तापला आहे. तसेच हिंदू महासंघाच्यावतीने आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण प्रक्रिया पार पडली. त्यानंतर हिंदू संघटनांनी पोलीस आणि मंदिर प्रशासनाला निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तरुणांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न

13 मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील दर्ग्यात संदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमादरम्यान आयोजकांच्या काही तरुणांनी धूप दाखवण्याच्या निमित्ताने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवले. त्यावेळी पोलीस आणि मंदिर प्रशासनाने दोन्ही बाजू समजून घेत वाद मिटवला. मात्र त्यानंतर मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून घटनेची चौकशी केली. त्यानंतर वाद वाढत गेला.

 

Google search engine