महाराष्ट्र मेट्रो रेलचे “लिटील वुड” ठरतंय नागरिकांचे विरंगुळा केंद्र ……

शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र

69
"लिटिल वूड "(नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प)

नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत लोकमान्य नगर अॅआक्वा लाईनवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळील लिटल वुड महामेट्रोने निर्माण केले आहे. अंबाझरी तलावाच्या काठावर उद्यान निर्माण करण्यात आले आहे. शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. उन्हाळ्याच्या मोसमात सकाळ- संध्याकाळ उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, छाया दार सुंदर आकर्षक फुले, फळांची झाडे, देशी,विदेशी रंगीबिरंगी पक्षी यांचा आश्रयस्थान बनलेले आहे. थंडी हवा पक्षांचा कोलाहल सुंदर परिसर आणि त्यातच आनंद द्विगुणीत होऊन जातो जेव्हा मोर आपल्या सुंदर पंख पसरवून आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध करतो. मोराच्या या सुंदर नृत्यामुळे मन मोहून जाते.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत महा मेट्रोने जवळपास ५,५०० झाडे लावण्यात आली. अंबाझरी तलावाजवळ सायकल ट्रॅक आहे सायकल चालवताना येथील रंगीबिरंगी सुंदर देशी-विदेशी पक्ष्यांचा थव्याचा नजारा देखणाच असतो. तलावाच्या किनाऱ्याजवळच्या परिसरात तीनशे लोक व्यायाम योगा करता येईल इतका मोठा परिसर दिसून येतो. सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात आले. पर्यावरणपूरक कडुलिंब, बाभूळ, कांजी, सुबाभूळ, चंदन, रक्तचंदन, रुद्राक्ष आंबा, पेरू ई.विविध प्रकारची फळझाडे, फुलांची व सावली देणारी झाडे लावण्यात आली.

पाईपलाईनद्वारे झाडांना खतांसह नियमित पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक 24 X 7 तैनात आहेत. परिसराची स्वच्छता आणि स्वच्छतेची व्यवस्थाही महा मेट्रोने केली आहे. लिटिल वुडमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक लिटिल वूडमध्ये फिरण्यासाठी सकाळ- संध्याकाळ येतात. शहरातील लिटिल वुडची चर्चा ऐकून इतर भागातील लोक आपल्या कुटुंबासह, वृद्ध, लहान मुले, महिला लिटिल वुड उद्यान बघण्यासाठी,फिरण्यासाठी येतात तसेच सकाळी महिला आणि वृद्ध व्यायाम करताना दिसून येतात.शहराच्या कोणत्याही दिशेनं इथं पोहोचणं अगदी सोपं आहे, वायुदेव नगर मेट्रो स्टेशनवरून खाली उतरून, उत्तर दिशेला, अंबाझरी तलावाच्या दिशेने, काही पावलं अंतरावर असलेल्या “लिटिल वूड ” ला सहज पोहोचता येतं

Google search engine