गोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनोपज असून यातून दरवर्षी अनेकांना रोजगार प्राप्त होत असतो. तर सध्याचा घडीला या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदू पत्ता तोडण्याची लगबग येथील ग्रामस्थ करतात. गोंदिया जिल्ह्यात मजुरांना महिनाभर हमखास रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता हंगामावर यंदा अवकाळी पावसाचे सावट आहे. मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत. सततच्या पावसामुळे तेंदूपत्ता हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात तेंदूपत्ता संकलन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा रोजगारावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी तेंदूपत्ता दर 950 रुपये शेकडा होता या वर्षी मात्र 400 रुपये शेकडा असून तेंदूपत्ता तोडणारे मजूर यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. एकाबाजूला अवकाळी पावसाने तेंदुपता वर रोग लागल्याचे दिसून येतो.तर दुसरी कडे दर कमी असून दर वाढविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.
रगरगत्या मे महिन्यात सध्या गोंदिया येथील ग्रामस्थांची मोठी लगबग सुरु आहे , भल्या पहाटे उठून येथील गावकरी जंगलालगत असलेल्या तेंदूपत्याची तोडणी करून त्याचे संकलन करण्याच काम ते करीत आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या संकलनातून भर मे महिन्यातही त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. तेंदूपत्त्याचा विचार केला असता पूर्व विदर्भात गोंदिया , गडचिरोली ,चंद्र्पुर व भंडारा या ठिकाणी अभयारण्य लगत तेंदू ची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या चारही जिल्ह्यातून उत्कृष्ट तेंदूपत्ता म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तेंदूपत्त्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे दर हंगामात मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते, तेंदूपत्त्यांचे आणखी विशेष म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटी त्याची कोवळी पाने झाडाला लागतात व मे महिन्यात त्याची तोडणी सुरु होते साधारणतः एक महिना चालणाऱ्या या तेंदूपत्ता तोड्यातून अनेक ग्रामस्थांना रोजगार प्राप्त होत असतो, तर सदर प्रक्रिया हि ऑनलाईन लिलाव पद्धतीने होत असून यामध्ये तेंदूपत्ता कंपन्या वनविभागाकडे 10 टक्के अमानत रक्कम जमा करून त्या त्या तालुक्यातील कंत्राट दर वर्षी घेत असतात, तर उर्वरित रक्कम हि प्रत्येक महिन्याला 30 टक्के या प्रमाणे एकूण तीन महिन्यात अदा करावी लागत असते ठेकेदारांचा माध्यमातून स्थानिकांना तेंदूपत्ता संकलनाचे काम देण्यात येते यामध्ये त्यांना 100 पुड्या मागे 400 रुपये एवढा दर देण्यातयेत असतो जर 100 पुड्यांचा विचार केला असता एका पुड्यात 70 पाने असतात व एकूण 100 पुड्या प्रमाणे त्यांना 7000 हजार तेंदू ची पाने एकत्रित करून अशापद्धतीने त्याची साठवणूक केल्या जात असते तर यांचा संकलनातून रोजगाराशिवाय कोटी रुपयाची उलाढाल सुद्धा या कालावधीत एकट्या गोंदिया जिल्ह्यातून होत असते.
तेंदूपत्ता हंगामावर यंदा अवकाळीचे संकट; ग्रामीण भागातील रोजगारावर परिणाम…..
तेंदूपत्त्याच्या संकलनातून भर मे महिन्यातही रोजगार