नवी मुंबई : बाजारामध्ये यंदा सुकी मासळी ही प्रचंड महाग झाली आहे. मासळी सुकवण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याचा परिणाम मासळ्यांच्या किमतीवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे मासे सुकवता आले नाहीत त्यामुळे त्याची आवक कमी झाल्याने दर गगनाला भिडले आहेत. याचा फटका हा व्यापाऱ्यांसह ग्राहकांना बसला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 ते 35 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. मासे आवडीने खाणारे लोक पावसाळ्यापूर्वी सुके मासे घेऊन ठेवतात, हे मासे ४ ते ५ महिने टिकतात. मांदेली, वाकटी, बोंबील, बांगडा, जवळा, करंदी, पापलेट, सुरमई, सुकट, या माशांना हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकवले जाते व नंतर त्याची विक्री होते. मात्र, यंदा हवामान बदलामुळे नुकसान सहन करावा लागत आहे. असं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.
वातावरण बदलामुळे सुक्या मासळीचे दर वधारले…
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 ते 35 टक्क्यांनी भाववाढ