हे तर स्वर्गदार, काळजी घ्या, अन्यथा थेट स्वर्गात जाण्याची शक्यता

डोंबिवली मध्ये खड्ड्यांविरोधात माजी नगरसेवक कैलास शिंदे यांचे आंदोलन

78

कल्याण : डोंबिवली मधील टाटा पॉवर नाका ते गर्डा सर्कल रोडवर वर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून रात्री खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा या रस्त्यावर अपघात होत आहे. या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने रोज एक अपघात होत आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्याने सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव न राहिल्याने आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरु आहे.

या परिसरातील माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेला खड्डे बुजवण्यासाठी अनेक पत्र दिले. मात्र पालिकेकडून त्या पत्रांना केराची टोपली दाखवण्यात आली असून अनेक वेळा फोन किंवा मेसेज करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर संतापलेल्या माजी नगरसेवक व स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या रस्त्यावर आज पालिकेचा निषेध व्यक्त करत या रस्त्याला “स्वर्गाचं प्रवेश द्वारा” असे नाव देत येथून प्रवास करताना काळजी घ्या, अन्यथा थेट स्वर्गात जाण्याची शक्यता आहे. असे नागरिकांना आवाहन केले व खड्ड्यात उभे राहून पालिके विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर येत्या दहा दिवसात पालिकेने हे खड्डे बुजवले नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालिकेला दिला आहे.

Google search engine