विदर्भातील समस्यांबाबत सर्वोतोपरी पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री कार्यालय मानद सचिव संदीप जोशी यांची ग्वाही

16

नागपूर : विदर्भातील जनतेकडून येणा-या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सर्वोतोपरी करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नवनियुक्त मानद सचिव (Honorary Secretary) माजी महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी दिली आहे.

संदीप जोशी गुरूवार ४ मे पासून उपमुख्यमंत्री कार्यालय देवगिरी, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दररोज सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत कार्यरत असणार आहेत. विदर्भातील जनतेने त्यांच्या समस्यांचे निवेदन दोन प्रतिमध्ये उपरोक्त वेळेत उपमुख्यमंत्री कार्यालय देवगिरी येथे सादर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालय मानद सचिव (Honorary Secretary) माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

विदर्भातील जनतेच्या अनेक समस्यांना मधल्या काळात दुर्लक्षित करण्यात आले. मुख्यमंत्री असताना श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी आवश्यक कामांचा धडाका लावला होता. मात्र मधल्या काळातील सरकारने विदर्भाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचा अवाका संपूर्ण महाराष्ट्र आहे. अशात नागपूर आणि विदर्भाकडे दुर्लक्ष होउ नये, याकरिता महत्वाची जबाबदारी त्यांनी सोपविली आहे. विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी पार पाडताना प्रत्येक समस्येकडे जातीने लक्ष देउन त्याचा योग्य पाठपुरावा घेतला जाईल.

Google search engine