नव्या कार्यकारिणीची आज घोषणा; तब्बल बाराशेची जम्बो टीम तयार

18

नागपूर : डबल इंजिनचे सरकार आणि भाजपचे ‘ऊर्जा’वान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी नऊ महिने लागले. तब्बल बाराशे सदस्यांची जंबो टीम राहणार आहे. नवी कार्यकारिणी (Executive) आज, बुधवारी जाहीर होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी 12 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. संघ तयार करण्यासाठी त्यांना 9 महिने लागले आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही तेवढाच कालावधी आहे.

खास निमंत्रित असलेल्या राज्यातील केंद्रीय आणि प्रादेशिक नेत्यांसह सुमारे बाराशे जणांची टीम असणार आहे. दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने स्थापना केली जाते. जुनी कार्यकारिणी साडेतीन वर्षांपासून कार्यरत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची ( Elections) तयारी केली जाणार आहे. त्यांनी 48 लोकसभा (Lok Sabha) आणि 200 हून अधिक विधानसभेच्या (VidhanSabha) जागा जिंकल्याचा पुनरुच्चार केला.

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची घोषणा केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस नवीन जिल्हाध्यक्षांची टीम तयार होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमित शहांची खिल्ली उडवणारे ठाकरे कधी उद्ध्वस्त होतील हे कळत नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. ते बारसूच्या बाजूला होते, आता नौटंकी खेळत होते. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला.

Google search engine