राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? उदय सामंतांचा गौप्यस्फोट

16

मुंबई : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केलेले विधान. ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) उर्वरित १३ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे (NCP) 20 आमदार आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा सामंतांनी केला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला वेग आला आहे.

ठाकरे गटातील उर्वरित १३ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरू आहेत. खारघर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ यांना मंत्रिपदावरून हटवल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला असून त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे.

Google search engine