मुंबई : राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे.
१७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत. सदस्यांमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. समन्वय समितीत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.