नागपूर : भारतीय मौसम विभाग आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांनी मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे आयएमडीच्या काही तासांपूर्वी स्कायमेटने मान्सूनचा अंदाज व्यक्त केलाय. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा पाऊस कमी प्रमाणात होणार आहे. तर आयएमडीच्या अंदाजानुसार पुरेसा पाऊस यंदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चांगल्या पाऊसमानासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने मंगळवारी यंदाच्या पाऊसमानाचा अंदाज जारी केला आहे. यंदा देशात सामान्य पाऊसमान होईल. विशेष म्हणजे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सोमवारीच यंदा देशात सामान्याहून कमी पाऊसमान होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. देशाच्या उत्तर व मध्य भागात यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले होते.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात दीर्घ कालावधी सरासरीच्या ९६ पाऊस होऊ शकतो. सरासरीच्या ९०-९५ टक्के झालेल्या पावसाला सामान्याहून जास्त पाऊसमान म्हटले जाते. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाला अतिवृष्टी व ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाला दुष्काळ म्हटले जाते. देशात वर्षभर जेवढा पाऊस होते, त्यापैकी ७० टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. आजही आपल्या देशातील ७० टक्के ते ८० टक्के शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.