मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आापल्या सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली आहेत. या पुस्तकांमधुन काही गोष्टी काढुन टाकण्यात आल्या आहेत.
महात्मा गांधी, नथुराम गोडसे आणि आरएसएसशी संबंधित काही माहिती एनसीईआरटीच्या नव्याने छापलेल्या पुस्तकांमधून काढून टाकण्यात आली आहे. ज्यांना हिंदूंनी बदला घ्यावा असे वाटत होते किंवा पाकिस्तान जसा मुस्लिमांसाठी होता, तसाच भारत हा हिंदूंचा देश व्हावा अशी ज्यांची इच्छा होती, अशा लोकांना महात्मा गांधी विशेषतः नापसंत होते. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी महात्मा गांधींच्या दृढ प्रयत्नांमुळे हिंदू कट्टर हिंदुत्त्ववादी इतके भडकले होते की त्यांनी गांधीजींच्या हत्येचे अनेक प्रयत्न केले. गांधीजींच्या मृत्यूचा देशातील जातीय परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. त्यानंतर भारत सरकारने जातीय द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई केली. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांवर काही काळ बंदी घालण्यात आली होती, असा उल्लेख काढुन टाकण्यात आला आहे.