मुंबई : बार कौन्सिलने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. बार कौन्सिलच्या या निर्णयामुळे सदावर्तेंना आता पुढची २ वर्ष वकिली करता येणार नाहीये. ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा’ने दिलेला निर्णय सदावर्तेंना मोठा झटका मानण्यात येतोय.
गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती. अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मणचेकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात वकिली प्रॅक्टिस करता येणार नाही.