नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या इंन्दोरा शाखेच्या पालक संचालक पदाचा पदभार ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर यांनी स्वीकारला. अशोक कोल्हटकर हे सलग तीनदा संचालक म्हणून बहुमतांनी विजयी झाले आहेत.
त्यांचे समर्पित कार्य लक्षात घेता त्यांना पालक संचालक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पदग्रहण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे संस्थापक उपाध्यक्ष आणि विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाब वानकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संस्थापक सचिव, माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक प्राचार्य जानराव गजभिये, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अरविंद गजभिये, संचालक अनिल नगराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर मोगरे, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव आणि बँकेचे ज्येष्ठ भागधारक सुनिल गणवीर, बेजनबाग मित्रपरिवारचे धीरज कडबे आदी उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष प्रा. वानकर आणि प्राचार्य गजभिये यांनी कोल्हटकर यांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना प्रा. वान कर आणि प्राचार्य गजभिये यांनी ग्राहकांना आणि भागधारकांना कोणताही त्रास होणार नाही आणि जलदगतीने चांगली सेवा देऊन बँकेच्या प्रगतीकडे सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी समर्पित भावनेतून कार्य करण्याचे मनोगत वेक्त केले. याप्रसंगी बोलताना नवनियुक्त पालक संचालक अशोक कोल्हटकर यांनी बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा प्रबंधक शीतल वाघ यांनी केले. लेखाधिकरी सुरेश खोंडे यांनी आभार मानले.