Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते ५८ वर्षांचे होते.
नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.