मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) आजही सौंदर्याच्या बाबतीत आघाडीच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते. रेखा करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिल्या होत्या. त्यावेळी रेखाचे नाव सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्यासोबत जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बोलण्यावरून जया बच्चन (Jaya Bachhan) आणि रेखा यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. पण फक्त जया बच्चनच नाही तर बॉलिवूडमध्ये आणखी काही अभिनेत्री आहेत ज्यांचा रेखासोबत छत्तीसचा आकडा आहे.
रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि नर्गिसमध्ये वादही झाला होता. 1884 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमीन आसमान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि संजय दत्त एकमेकांच्या जवळ आले होते. रेखा आणि संजय दत्त (Sanjay Datt) यांच्याबद्दल इंडस्ट्रीत वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळाल्या. रेखाने संजय दत्त यांच्या नावाचे कुंकू लावले असल्याची अफवा पसरल्या होत्या. पण त्याआधी 1976 मध्ये नर्गिसने रेखाबद्दल मीडियासमोर मोठे वक्तव्य केले होते. नर्गिस म्हणाली, “ती पुरुषांना जाणूनबुजून असे संकेत देते जेणेकरून त्यांना वाटेल की ते तिला सहज मिळवू शकतील. मात्र, काही लोकांच्या नजरेत ती डायनपेक्षाही वाईट होती.
जया बच्चन आणि नर्गिस यांच्याव्यतिरिक्त रेखा यांचे अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्याशीही वाकडं होतं. ‘भोला-भाला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि मौसमी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर समोर आले, तेव्हा पोस्टमध्ये रेखा यांच्या फोटोला मौसमींपेक्षा जास्त जागा देण्यात आली होती. यावरूनही दोघींमध्ये मोठा वाद झाला असल्याचे सांगण्यात येतं.