महिला आरक्षणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचले.
अकोला (Akola) : महिला आरक्षण आणि सक्षमीकरणाची बिजे रोवण्याचे काम काँग्रेसने केले ना, ना भाजपने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी(Dr. Babasaheb Ambedkar) ते केले, असे खडेबोल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) यांनी काँग्रेस(Congress) आणि भाजपला(BJP) सुनावले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या विरोधात प्रतिक्रिया देत काँग्रेसला कोंडीत पकडण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. आता महिला आरक्षण विधेयकावरून आंबेडकरांनी पुन्हा काँग्रेसला डिवचले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींबाबत(OBC) काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. काँग्रेस जर ओबीसीची बाजू घेत आहे तर त्यांनी या विधेयकात ओबीसींचा समावेश करण्याच्या कलमांमध्ये दुरुस्ती का केली नाही, असा सवाल काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. विधेयकावरून काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी “मला या विधेयकात ओबीसी आरक्षणाचा समावेश पाहायला आवडेल. यामुळे भारतीय महिलांच्या मोठ्या भागाला या आरक्षणात प्रवेश मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते या विधेयकात नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला चांगलेच कोंडीत पकडले आहे.
काही दिवसांपूर्वी रोहित पवारांना(Rohit Pawar) सुनावले
आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये, असे विधान राष्ट्रवादीचे आमदार (शरद गट) रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानाला वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या पुत्राने तसेच वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
सुजात यांनी म्हटले की, इंडिया आघाडी आम्हाला आपल्यात सामावून घेत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही निवडणूकच लढायची नाही का? आम्हाला जो सल्ला दिला जातोय, तोच सल्ला तुम्ही तुमच्या पक्षांना का देत नाही? देशातील वंचितांनी आणि बहुजांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का? जसं तुम्ही शतकानुशतके करत आला आहात.
28 पक्ष एकत्र ‘इंडिया’ आघाडी स्थापन
भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला इंडिया असं नाव दिले आहे. या आघाडीत महाराष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार(Sharad Pawar) गट आणि शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत.
वंचित, एमआयएमला वंचितचे निमंत्रण नाही
परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही.