आता जरांगे पाटलांचा लढा कोणत्या दिशेने जाणार?
जालना (Jalna) : जालना जिल्ह्यातील अंबड (Ambad) तालुक्यामधील आंतरवाली सराटी गावात (Sarati) मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakkshan) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू होते. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सातत्याने शिष्टमंडळ देखील पाठविले जात होते. पंरतु, या शिष्टमंडळाला त्यांची मनधरणी करतांना अपयश येत होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले.
आपल्या मागण्या हे सरकार पूर्ण करतील ही आमची अपेक्षा आहे. तर आम्ही पुन्हा अधिकचे दहा दिवस वाढून देतो. पण न्याय द्या, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. आता उपोषण सुटले पण आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याबाबत जाणून घेऊया.
एकनाथ शिंदेचे न्याय देतील- जरांगे पाटील
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पित उपोषण मागे घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला. त्यातच त्यांनी सर्व भूमिका स्पष्ट केली. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? याबाबत जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देतील ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत. तीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे.
समाजाला विचारून एका महिन्यांचा वेळ
सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता. याआधी मी संपूर्ण समाजाला विश्वासात घेतले. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का? तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का? हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला
ते पुढे म्हणाले की, सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचे खाऊन समाजाचे काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी येथे शिंदें साहेबांना आणूनच दाखवले.
जरांगे रुग्णालयात उपचारासाठी जाणार?
दरम्यान, आता उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तर उपस्थित लोकांकडून देखील त्यांनी मान्य करुन घेतले. की जरांगे यांनी उपचार घेतले पाहिजे की नाही, त्यावर लोकांनी देखील होकार दर्शविला. आता जरांगे पाटील यांनी देखील उपचार घेण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे आज सायंकाळ नंतर ते रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होणार आहेत. असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
महिनाभर सरकारला फोनदेखील नाही?
वेळ दिल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी महिनाभर आम्ही आंदोलक म्हणून सरकारला साधा फोन देखील देणार नाही. त्यांनी युद्ध पातळीवर कामे करावे, आम्हाला न्याय द्यावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. आमचे कुठेही आंदोलन, उपोषण होणार नाही. तर गावोगावी सुरू असलेल्या साखळी उपोषणदेखील तितकेच शांततेत पार पाडले जातील. आंतरवाली सराटीतदेखील आम्ही या आंदोलनस्थळी बसू पण त्याचा कोणालाही त्रास होणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेली आहे.