राष्ट्रवादीला भगदाड; अजित पवारांनी आणखी सात आमदारांना फोडलं

39

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत सत्तेत आले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात अर्थ, सहकार आणि कृषी अशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. पण पुरोगामी विचार पुढे नेणार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आणखी सात आमदार फोडले आहेत.

नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. पदाधिकाऱ्यांसह आमदारांनीही अजित पवारांना साथ दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नागालँड विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळाले. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. शरद पवारांनीच नागालँडमध्ये आपल्या आमदारांना सत्तेत बसवून भाजपला पाठिंबा दिला. भाजपने 12 तर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने 25 जागा जिंकल्या. दोघांनी मिळून सरकार स्थापन केले होते. इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे.

Google search engine