अजित पवारांनी कुणाला मारला ‘डोळा’? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

52

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोळा मारल्याच्या चर्चांना उधाण आलाय. अजित पवार यांचा डोळा मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवारांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर डोळे मिचकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अजित पवार डोळा मारल्याचं कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी डोळा मारला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांना नाशिक येथील पत्रकार परिषदेत तुम्हाला चिन्ह मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. चिन्ह कुणाला मिळेल हे आगामी काळात दिसेल, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांनी डोळा मारला. अजित पवार यांची ती उत्सफुर्त प्रतिक्रिया होती. पण त्यांनी तो डोळा नेमका कुणाला मारला? यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

डोळे मारल्याची चर्चा

शिंदे-फडणवीस सरकारने मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवन परिसरात विरोधी पक्षांची पत्रकार परिषद झाली. सुरूवातीला अजित पवार मीडियासमोर आपली भूमिका मांडत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे पुढे आले.

 

Google search engine