पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; म्हणाल्या, “मी राजकारणातून ब्रेक घेणार आहे”

61

मुंबई : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) काँग्रेसमध्ये (Congress) जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतल्याचेही दावे करण्यात आले होते. मात्र, आज पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आपण पक्ष सोडत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या चर्चा सध्या थांबल्या असल्या तरी या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा केली.

“एखाद्या घटनेची माहिती समाजाच्या जबाबदार नेत्याकडे असेल आणि तो म्हणत असेल की मी ती हळूहळू देत आहे, तर ते लोकांच्या हक्कांचे उल्लंघन नाही का?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. “एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे माहिती असेल, तर ती माहिती राजकीय फायद्यासाठी वापरण्याऐवजी ती माहिती न्यायासाठी वापरली जावी आणि शिक्षा व्हावी,’ अशी माझी भूमिका आहे,” असेही त्या म्हणाल्या.

“मी प्रचंड संभ्रमात आहे”

या सगळ्या भूमिकांशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड संभ्रमात आहे. मी गेल्या 20 वर्षात सुट्टी घेतली नाही. मला एक किंवा दोन महिने सुट्टी हवी आहे. मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पहिल्या मुलाखतीचा संदर्भही दिला. “माझी पहिली मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली होती. ज्या विचारधारेने राजकारणात आले, त्या विचारसरणीशी फसवणूक करून चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा राजकारण सोडायला मागेपुढे पाहणार नाही, असे मी तेव्हा म्हटले होते. सध्या मला विश्रांतीची गरज आहे. मी तो ब्रेक घेणार आहे. मी एक किंवा दोन महिने ब्रेक घेणार आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातील सद्गुणांवर चिंतन करीन. मी त्याच मार्गावर आहे की नाही हे मला तपासण्याची गरज आहे,” ती म्हणाली.

Google search engine