2024 नंतर एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

17
CM Eknath Shinde Dept. CM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde Dept. CM Devendra Fadnavis

भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा.

मुंबई (Mumbai) : राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमचे मुख्यमंत्री होतील.निश्चितपणे यात काही शंका नाही, बाप्पाने हे निश्चितच केल आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Laad) यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, प्रसाद लाड पुढे म्हणाले की, 2024 नाही, तर 2034 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार या देशात राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गेले वर्षभर राज्याच्या राजकारणात उलथापालथ

गेले वर्षभर राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी सत्तासोडत वेगळी चूल मांडत भाजपसाबेत सत्ता स्थापन केली. यावेळी भाजपचे 106 आमदार असताना भाजपच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. यामुळे आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार अशा चर्चा सुरू असतात. यात देवेंद्र फडणवीस हे नेहमीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगत असतात. मात्र, आमदार प्रसाद लाड यांचे वक्तव्य यापेक्षा वेगळे असल्याने राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.

संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांची प्रतिक्रिया

संजय शिरसाट म्हणाले की, राजकारणात प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, त्याला निश्चितच असे वाटत असते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्यासारखेच आमचेही म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ज्या पद्धतीने काम करत आहेत, पुढील वेळेला तेच मुख्यमंत्री राहावेत. प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव घेणे काही गैर नाही. आम्हालाही वाटते की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या गटाला वाटते की, अजित पवार मुख्यमंत्री होतील.

Google search engine