चौंडी येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने पुण्यातील दवाखान्यात हलवले.

24
Dhangar धनगर आंदोलन
Dhangar धनगर आंदोलन

धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार.

अहमदनगर (Ahmednagar) : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी (ST) संवर्गत समाविष्ट करावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा पंधरवा दिवस आहे. तरी देखील सरकार आणि आंदोनकर्ते यांच्यातील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला पुणे (Pune) येथे हलवण्यात आले आहे. त्याला आधीच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत जास्त सुधारणा झाली नव्हती.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. अखेर राज्य सरकारला आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. त्यासाठी मराठा समाजाने चाळीस (40) दिवसांची मुदत दिली आहे. याच दरम्यान धनकर समाजाच्या आरक्षणासाठी देखील चौंडी येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील भेट घेतली होती. तसेच सरकारच्यावतीने लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, सरकार आणि आंदोलक यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे.

Google search engine