बोलून मोकळे व्हायचे…:मुख्यमंत्री आरक्षणप्रश्नी गंभीर नाही

व्हायरल व्हिडिओवरुन रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

20

नागपूर : आपल्याला काय? बोलायचे अन् निघून जायचे, बोलून मोकळे व्हायचे” या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath shinde) यांच्या व्हायरल व्हिडिओतील वाक्याने सध्या राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) सोबत पत्रकार परिषदेला येत असतानाचा हा संवाद आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या या व्हिडिओवरून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नागपुरात बोलताना शिंदेंवर चांगलीच टीका केली. “मुख्यमंत्र्यांचे असे बोलणे म्हणजे ते आरक्षणासह जनतेच्या प्रश्‍नांवर गंभीर नाहीत याचे निदर्शक आहे. राजकारणात केवळ पदे मिळवण्यासाठीच ते गंभीर आहेत’ अशी टिका पवार यांनी केली आहे.

आज लोकसंखेंचे प्रमाण पाहिले तर केंद्राने जीआर काढून ईडब्ल्यूएस कोटा आणला. सरकारला मराठा (maratha), मुस्लिम (muslim arakshan) आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवायला पाहिजे. पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष, अधिवेशनात ( adhiveshan)हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. त्यावेळी गरज पडल्यास आम्ही सगळे सरकारसोबत राहू. यात राजकारण न करता हा प्रश्न सोडवला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

मोठ्या इंजिनसमोर चालत नाही

भाजपचे (bjp) काही कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते न्यायालयात गेले आहेत. आरक्षणाच्या संदर्भात भाजप नेहमी दुटप्पी भूमिका घेत आली आहे. राज्यात धनगर आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. केंद्राने त्याला विरोध केला. भाजप सुरुवातीपासून आरक्षणाच्या विरोधात असल्याचे पवार यांनी सांगितले. आरक्षण देण्याची भाजप नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही. त्यांच्या तीन इंजीन सरकारचे विचार केंद्रातील मोठ्या इंजीन समोर चालतात का, असा सवालही त्यांनी केला.

शरद पवारांनी राष्ट्रवादीची विदर्भाची जबाबदारी दिलेले नेते एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले. परिणामी विदर्भात राष्ट्रवादी सर्वदूर पाेहोचू शकली नाही अशी टिका प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता केली. या नेत्याला केंद्रातील जबाबदारीही दिली होती. शरद पवारांचे विचार ते लोकांपर्यत पोहोचवू शकले नाही असे रोहित पवार यांनी सांगितले.

Google search engine