आता सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचे आमरण उपोषण

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध

30
सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती
सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती

नागपूर : मराठा ( maratha)  समाजाला सरसकट कुणबी ( kunbi) जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी ( OBC) संवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी मनोज जरांगे ( manoj jarange) केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ (National OBC Federation) आणि सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने ( Kunbi OBC Movement Action Committee)  या मागणीचा विरोध करत संविधान चौकात 2 दिवस साधे आंदोलन केले. सरकारने या प्रकरणी दबावात येऊन निर्णय घेतल्यास सोमवार 18 पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यासंबंधी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी प्रसार माध्यमांशी (media) बोलताना दिला.

आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडून मंगळवारी कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला 1 लाख रुपयाची देणगी देण्यात आली. तसेच तेली समाज संघटनेकडून कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनाला लेखी जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसे पत्र कृती समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम शहाणे पाटील यांना देण्यात आले.

आम्ही आजपासून संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. चंद्रपूरमध्ये रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मुंबईमध्येही आंदोलन सुरू करणार आहोत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आधी जरांगे म्हणायचे स्वतंत्र आरक्षण मागितले. पण ते आता कुणबी प्रमाणपत्र मागत आहेत. काल सरकारने घेतलेल्या पत्रपरिषदेत स्पष्टता नाही. वंशावळ किंवा 1965 पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये मराठा म्हणून नोंद असल्यास मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यास हरकत नाही.

मात्र सरसकट प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने कागदपत्रे नसलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे जाहीर करावे. नाही तर सोमवारपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करू असा इशारा तायवाडे यांनी दिला. सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवावे, आमच्या मागण्यांवर बोलावे आणि लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा आंदोलन थांबणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सरकारने लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. शासन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नाही. धनगर समाजाला असेच आश्वासन दिले होते. मात्र सरकार आल्यावर पूर्तता केली नाही. त्यामुळे आता सरकारने दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही. आम्हाला लेखी आश्वासन हवे आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Google search engine