टेक हब म्हणून उदयास येण्याची क्षमता असलेल्या देशभरातील 26 शहरात नागपूर

डेलॉईट आणि नॅसकॉमच्या अहवालात नागपुरसोबत नाशिकचाही समावेश

31
नागपूर
नागपूर

नागपूर : टेक हब म्हणून उदयास येण्याची क्षमता असलेल्या देशभरातील 26 शहरात राज्यातील नागपुरचाही (nagpur) समावेश करण्यात आला आहे. डेलॉईट आणि नॅसकॉमच्या अहवालात ( report by Deloitte and Nasscom) नागपुरसोबत नाशिकचाही समावेश केला आहे. महाराष्ट्रात मेट्रोपाॅलिटन सिटी म्हणून झपाट्याने चौफेर विकास होत असलेले नागपूर टेक हब म्हणून विकसित क्षमतेचे शहर आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजी हब्स ऑफ इंडिया’ (Emerging Technology Hubs of India) या अहवालात नागपूरचे वर्णन मुंबई (mumbai), पुणे (pune)आणि हैदराबाद या शहरांपासून समान अंतरावर असणे आणि देशभरातील केंद्रांसाठी ‘महत्त्वपूर्ण डेस्टिनेशन’ (important destination) म्हणून करण्यात आले आहे. याशिवाय, समृद्धी महामार्गामुळे मुंबई (mumbai) आणि पुण्याशी शहराची जोडणी जलद होत असल्याने त्याचा फायदा नागपूरला होत आहे.

नागपूर हे देशातील मोक्याचे स्थान असून भविष्यातील विकासाच्या दृष्टिने उदयोन्मुख शहर आहे. एक आघाडीचे टेक हब म्हणून उदयास येण्याची क्षमता नागपूरमध्ये असल्याचे अहवालात नमुद केले आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण, व्यापक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावर केंद्रित संस्थांचे एक अग्रेसर केंद्र म्हणून उदयास येण्याची क्षमता, आपल्या उद्योगाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी उत्तम ठिकाण असून येथे त्यासाठी अनुकूल वातावरण आहे. नागपुरात अनेक सेवा प्रदाते आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) आहेत. यामुळे नागपूर विविध उद्योगांसाठी उद्योजकांच्या पहिली पसंती ठरले आहे. चांगल्या शैक्षणिक संस्था, आणि इनक्युबेशन सिस्टीमसह नागपूरमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रे आणि तंत्रज्ञान उद्यमींसह समृद्ध तंत्रज्ञान हबसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असल्याचे अहवालात नमुद केले आहे.

डेलॉइट आणि नॅसकॉमने तयार केलेल्या अहवालात नागपूरच्या उपयुक्ततेकडे लक्ष वेधले आहे. यामध्ये प्रशिक्षण केंद्रांसह 200 हून अधिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन संबंधित व्यवसाय सेटअपची उपस्थिती, याशिवाय 550 हून अधिक तंत्रज्ञान आणि बीपीएम-संबंधित व्यवसाय सेटअप, नागपूरमधील रोजगार आणि प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांची विपूल उपलब्धता आणि शेजारची विकसित शहरे, टेक डोमेनसाठी दर्जेदार प्रतिभांची उपलब्धता, “ग्रेड ए’ ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चरची उच्च उपलब्धता आणि विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून मिहान-सेझ अशा सर्व उपयुक्त गोष्टी नागपुरात असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार नागपूरमध्ये उत्तम व्यवसाय सुलभता आहे. हा प्रदेश एरोस्पेस आणि संरक्षण, कापड आणि अन्न प्रक्रिया केंद्रासाठी विकसित केला जाणार आहे.भारतातील स्टार्ट-अप्ससाठी सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणांपैकी नागपूर हे 23 व्या क्रमांकावर आहे आणि 300 हून अधिक तंत्रज्ञान स्टार्ट-अपचे घर आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Google search engine