अंबरनाथ : मोबाईलच्या सापळ्यात नवी पिढी पूर्ण अडकल्याचे आपण पाहतो. एवढंच काय त्यांच्या स्मार्टफोनला (smartphone) जर कोणी साधा हात लावला तरी त्यांना प्रचंड राग येतो. आता तर अंबरनाथमध्ये (Ambernath) एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल (mobail) न दिल्याने एका तरुणाची रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दोन मित्रांना बोलावून मृतदेह थेट पाणी साचलेल्या डबक्यात फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नकार देताच घातला लोखंडी रॉड
अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसीजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकाम सुरू असताना लालजी सहाय हा तरुण फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी शंभू मांझी हा तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र लालजी यांनी मोबाईल न दिल्याने शंभू याला राग आला आणि त्याने बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने लालजी यांच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दोन मित्रांना बोलावत मृतदेह फेकला
मात्र हत्या झालेल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न शंभू याला पडला होता. त्यानंतर शंभू यांनी आपले दोन मित्र मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोघांची मदत घेत पालेगावजवळ हा मृतदेह पाण्याने भरलेल्या एका डबक्यात फेकून दिला. त्यानंतर हे तिघेजण फरार झाले. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस दाखल झाले.
तिनही आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली. या प्रकरणात 40 संशयित जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणात तीन आरोपींची नावं समोर आली. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून शंभू मांझी, मनोदीप जामु, चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक करण्यात आली आहे. तर या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची पोलिस कठोडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी दिली आहे.