मुंबई : जालना येथील मराठा आंदोलकांवर (Maratha agitators) झालेल्या लाठीचार्ज (baton charge) प्रकरणाची सरकारमधील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा (resignation) द्यावा, अशी मागणी शरद पवार ( sharad pawar) यांनी केली. त्यांनी फडणवीसांचे (devendra fadanvis) नाव न घेता त्यांन टोला लगावला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक बाबींवर प्रकाश टाकला. पवार म्हणाले- जेव्हा मी मुख्यमंत्री असताना गोवारी आंदोलनात काही लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा आदिवासी मंत्री म्हणून मधुकर पिचड यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. तसाच काहीसा निर्णय आत्ताच्या सरकारने घेणे गरजेचे आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारून आंदोलकांना न्याय देण्याची गरज आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांवर बळाचा वापर केला गेला
मुंबईवरून कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर पोलिस बोलावले गेले. अतिशय अमानुषपणे आंदोलकांवर हल्ला लाठीचार्ज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे काही व्हिडिओ समोर येत आहेत. त्यात पोलिसांकडूनच आंदोलकांवर व ज्यांचा यात काहीही संबंध नव्हता, अशा लोकांवर देखील व महिलांवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे. एका प्रकारे आंदोलकांवर व ग्रामस्थांवर बळाचा वापर करण्यात आलेला आहे.
न्यायालयीन चौकशीची मागणी
शरद पवार म्हणाले की, जालन्यातील आंदोलकांवर ज्या पद्धतीने बळाचा वापर करून हल्ला केला गेला तो अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी होईल, असे सांगितले जात आहे. ते पूर्णपणे चुकीची राहील. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी. अशी मागणी शरद पवार यांनी केली.