झेंडा लावायला मंदिरावर चढले अन् देवाघरी गेले

रक्षाबंधनाच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू

4
temple
temple

वर्धा (wardha) : मंदिरावर ( temple) झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा विजेच्या धक्क्यामुळे ( electric shock) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. ऐन रक्षाबंधनाच्या (raksha bandhan) दिवशीच ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिपरी मेघे गावातील घटना

यासंबंधीच्या वृत्तानुसार, वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली. अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) व सुरेश झिले (33) अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. मंदिराच्या झेंड्याचा खांब जवळपास 25 फूट उंच होता.

झेंड्याचा खांब विजेच्या तारावर पडला

मंदिरावर झेंडा लावताना अचानक खांब कलंडला आणि शेजारून जाणाऱ्या 33 केव्ही विजेच्या तारेवर पडला. यामुळे अशोक सावरकर, बाळू शेर व सुरेश झिले या तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. ते तिघेही मंदिराच्या शेडवर पडले. 3 पैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रक्षाबंधनाच्या दिवशीच घटना

रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. त्यात सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.

Google search engine