फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ महागात पडेल - नाना पटोले

35

मुंबई : या सरकारला (government) नोकर भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येत नाही, दोषींना शिक्षा करण्याची मानसिकताही या सरकारमध्ये नाही. उलट पेपर फुटीतच्या (Paper shredding)बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला जातो हे अत्यंत आक्षेपार्ह व निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा प्रकार आहे, असा आरोप काँग्रेस (congres) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (nana patole) यांनी केला आहे.

दरम्यान नाना पटोले म्हणाले की, गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे नाही. नोकर भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ तिघाडी सरकारने थांबवावा अन्यथा विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले तर सरकारला ते महागात पडेल.

विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा करत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जातात. 4466 तलाठी पदासाठी राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज भरले आणि यातून 1 अब्ज 4 कोटी 17 लाख रुपयांचे परीक्षा शुल्क घेतले पण विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्रही दिले नाही. परीक्षेसाठी स्वतःच्या जिल्ह्यातून दूरचे परीक्षा केंद्र दिले गेले. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परीक्षांना मुकले आहेत. एवढे करुनही या परीक्षेचा पेपर फुटला हे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचा प्रकार आहे.

राज्य सरकार गंभीर नाही

नाना पटोले म्हणाले की, नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परीक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. तलाठी परीक्षेच्या पेपर फुटीमागे जे लोक असतील त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही.

Google search engine