CM शिंदेंची प्रकृती खूप खराब, संजय शिरसाट यांच्या दावा

15 ऑगस्टनंतर त्यांना बळजबरीने ॲडमिट करणार ?

9
CM शिंदें
CM शिंदें

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 15 ऑगस्टनंतर बळजबरीने रुग्णालयात ॲडमिट (Admit) करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या (shivsena) शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा (satara)  जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. ते पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यालाही उपस्थित राहिले नाही. प्रारंभी ते या कार्यक्रमाला ऑनलाइन हजर राहतील असे सांगण्यात आले. पण ते ऑनलाइनही हजर राहिले नाही. त्यातच आता संजय शिरसाट यांनी त्यांच्या तब्येतीविषयी उपरोक्त विधान केल्यामुळे नवी चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती ाहे. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही त्यांना ‘बळजबरी’ने… हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. आम्ही त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे की, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहिती आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

शिंदे गावी गेलेत, लंडनला नाही

मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रकृ्तीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एक दिवस त्यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते गावी गेलेत. आपल्या गावी जाऊन 1 दिवस आराम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते लंडनला गेले नाहीत, असा टोलाही शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाला हाणला.

संजय राऊत यांना ॲडमिट करण्याची गरज

सत्ताधारी पक्षांत पालकमंत्रीपदावरूनही कोणतीही नाराजी नाही. काहीजण जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवत आहेत. त्यांना काम नाही म्हणून असली विधाने सुरू आहेत, असे शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांना तातडीच्या उपचारांची गरज आहे. त्यासाठी त्यांना तत्काळ ॲडमिट करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Google search engine