BJP पदाधिकारी सना खान यांचा मित्र अमितनेच केला खून

गेल्या आठ दिवसांपासून होत्या बेपत्ता, नोकर जीतेंद्र गौडला अटक

6
सना खान
सना खान

नागपूर : नागपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या (bjp) सक्रिय पदाधिकारी सना खान यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. त्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणात सना खान (sana khaan )  हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि सना खान यांचा मित्र अमित शाहू याचा नोकर जीतेंद्र गौड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान या 1 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्या जबलपूरमधील त्यांचा मित्र अमित ऊर्फ पप्पू शाहू याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना खान या अमितच्याच घरी मुक्कामी होत्या. अमित आणि सना खान या दोघांमध्ये चांगले संबंध होते. त्यामुळे अमित शाहूच्या पोलिस दलात नोकरीवर असलेल्या पत्नीला संशय आला होता. 2 ऑगस्टपासून सना बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात सना बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

सना खान प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. गौड याने अमितच्या कारच्या डिक्कीमध्ये सांडलेले रक्त साफ केल्याची कबुली दिली. सना यांचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

Google search engine