ताजनगर येथे ईदगाहचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

127.05 लक्ष रु. निधी मंजूर

41

नागपूर :- उत्तर नागपूरतील ताजनगर, टेका येथे मुस्लीम बांधवाना नमाज अदा करता यावे याकरिता इदगाहची निर्मिती करण्यात येत आहे. या ईदगाह च्या बांधकामाचे भूमिपूजन आज राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना डॉ. राऊत यांनी सांगितले कि मतदारसंघातील अनेक ठिकाणी सर्व समाजाची प्रार्थना स्थळे असतील, मंदिरांसाठी सांस्कृतिक सभागृह असतील, किंवा सरंक्षण भिंतीचे प्रश्न असतील या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच धार्मिक स्थळाना विजेच्या बिलेची समस्या होऊ नये, या करिता तेथे सोलर सिस्टीम बसविण्यात आले आहे. उत्तर नागपूरतील एकूण 60 मस्जिद व मदरसे येथे सोलर सिस्टीम बसविण्यात आले आहे. यापुढेही सर्व समाजांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करत राहू. सर्वांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन त्या जोपासण्याचा प्रयत्न माझ्याकडून नेहमीच केला जाईल, यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. लवकरच य ठिकाणी इदगाहचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे म्हणालेत.

यावेळी मुफ्ती अब्दुल खान, मौलाना अब्दुल हबीब, इमाम मौलाना साबिर साहब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव संजय दुबे, नागपुर शहर कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, ठाकूर जग्यासी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शकिल अहमद सिध्दीकी, हाजी वसीम अहमद मलीक, मोहम्मद इसराईल, इब्राहीम टेलर, अब्दुल कुरेशी, निसार अहमद मलिक, मुश्ताक अहमद, हाजी कुरेशी, सय्यद दरवेज रिजवी, हाजी इमरान सिध्दीकी, सादिक नुसरत शेख ईरशाद यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ईदगाहच्या निर्मिती साठी डॉ. राऊत यांच्या स्थानिक निधीतून 127.05 लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रसंगी नागपुर सुधार प्रन्यासचे विभागीय अधिकारी कमलेश टेंभर्णे, ईदगाहचे वास्तूकार अशफाक अहमद यांची ही कार्यक्रम स्थळी उपस्थिती होती.

सध्या राज्यात जातीय दंगली घडत असून जाती-जातीमध्ये संघर्ष कसा निर्माण होईल यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या प्रवृत्तीमागे कोणाची शक्ती आहे आणि कोण याला प्रोत्साहन देत आहे, हे सांगायची गरज नाही. हे देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा एक मोठा घटक काम करत आहे. जाणीवपूर्वक राज्यात दूषित वातावरण होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. त्या वर्गापासून आपण सावध राहील पाहिजे. सर्वांनी एकत्र राहील तर यांना धडा शिकवणे अवघड नाही. असे ही यावेळी डॉ. नितीन राऊत म्हणालेत.

कार्यक्रमाचे संचालन डॉ रजिऊद्दीन सिध्दीकी यांनी केले तर मुस्लीम कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष डॉ. नियाजुद्दीन सिध्दीकी यांनी आभार मानले.

 

Google search engine