‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीचे विशेष दालन

39

नागपूर : महाराष्ट्र शासनाचा निर्देशानुसार सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत पूर्व नागपुरात “शासन आपल्या दारी” मंगळवार ८ ऑगस्ट ते शुक्रवार ११ ऑगस्ट दरम्यान भवानी माता मंदिर परिसर, पुनापूर, येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हा परिसर नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत येत असल्यामुळे या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी स्टाल लावण्यात येणार आहे.

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागरिकांसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत नगर रचना परियोजना मध्ये भूखंड बाधित होतो किंवा नाही याची माहिती दिली जाईल, तसेच प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या पुनर्वसन पुनर्वसाहत धोरणबाबत माहिती प्रकल्प बाधितांकडून कागदपत्रे जमा करून घेण्यात येईल.

नगर रचना परियोजना क्षेत्रामध्ये बाधित भूखंडाबाबत अभिप्राय, नाहरकत, पोट हिस्सा मोजणी साठी नाहरकत पत्र, झोन नकाशा, इमारत बांधकाम मंजुरी मिळण्यासाठी अर्ज स्वीकारले जातील. तसेच नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरातील विविध प्रकल्पांची माहिती देखील दिली जाईल. या शिबिराला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Google search engine