राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईला प्रस्थान

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या दौऱ्यामध्ये होते सहभागी

6
राज्यपाल रमेश बैस
राज्यपाल रमेश बैस

नागपूर : महाराष्ट्राचे (maharashtra) राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नागपूर येथील विविध कार्यक्रमात शुक्रवारी सहभागी होऊन आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईकडे (mumbai) प्रस्थान केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांच्या कालच्या दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांना निरोप दिला. शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळा व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

Google search engine