भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

मुंबईच्या कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार

10
मुलीवर अत्याचार
मुलीवर अत्याचार

मुंबई : कल्याणमधून (kalyan)एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचाराचा (Abuse of a girl) प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बुधवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली. अल्पवयीन विद्यार्थिनी क्लास आटोपून घरी परतत होती. विशालने तिचा पाठलाग केला आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन विद्यार्थिनींना त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली.

नेमका काय घडला प्रकार?

शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला होता. विशाल गवळी याच्या विरोधात याआधीदेखील बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. संधी मिळताच आरोपी विशालने एका कोपऱ्यात तिला खेचत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थीनिने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

आरोपी विशाल गवळीला याआधी तडीपारदेखील करण्यात आले होते. नराधम विशाल याचा माज इतका आहे की पत्रकारांच्या कॅमेराकडे बघून त्याने victory ची साईन दाखवली.

महिला आयोगाकडून दखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि तडीपार असलेला आरोपी मोकाट आहे. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. राज्याचे गृहमंत्री आपण दखल घेऊन आरोपी व संबंधित यंत्रणेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे.

Google search engine