नागपूर : राज्य हातमाग (handloom) महामंडळातर्फे ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हॅण्डलूम (Handloom) डे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ५ ते १६ ऑगस्टदरम्यान हॅण्डलूमद्वारे उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात १० टक्के अतिरिक्त विशेष सूट देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन उमरेड मार्गावरील, निर्मल नगरी जवळील राज्य हातमाग महामंडळाच्या परिसरात लावण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभारी आयुक्त सीमा पांड्ये यांनीं दिली.
राज्य हातमाग महामंडळातर्फे ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हॅण्डलूम डे निमित्त महामंडळायच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी १०-१२ विणकारांचा सत्कारही करण्यात येईल. दरम्यान आयोजित प्रदर्शनात हातमागावर तयार होणाऱ्या कपड्यांवर विशेष डिस्काऊंटसह ग्राहकांना तब्बल 30% ची सूट दिली जाणार आहे. तसेच ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना पाच टक्के सूट दिली जाईल.
सोबतच हॅण्डलूमद्वारे उत्पादित कपड्यांचे कॉलेजच्या मॉडेल्सद्वारे रॅम्पवर डिस्प्ले केल्या जाणार आहे. अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या प्रभारी आयुक्त सीमा पांडे यांनी दिली. दरम्यान भारत सरकारच्या कल्चरल मिनिस्ट्रीद्वारे एफएमच्या माध्यमाने हर घर हेल्दी याचे कॅम्पेन सुरू आहे. यात हॅन्डलूमचे उत्पादन जनतेसाठी कसे हेल्दी आहे याविषयी सीमा पांडे यांनी बुधवारी माहिती दिली.