राज्यात दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सुरू

50

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली. दहावीच्या परीक्षेसाठी 49 हजार 468 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून बारावीच्या परीक्षेसाठी 70 हजार 462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही परीक्षांसाठी मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यासाठी राज्य मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे ग्रेड सुधारायचे आहेत त्यांनाही या परीक्षेत संधी मिळते. या परीक्षेसाठी राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान, बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 70 हजार 462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 10वीच्या परीक्षेसाठी 49 हजार 468 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई विभागांतर्गत सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी झाली आहे. इयत्ता 12वीसाठी 29 हजार 458 विद्यार्थ्यांनी तर 10वीसाठी 15 हजार 135 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

 

 

 

Google search engine